मनोगत
‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबरच्या अंकासाठी साहित्य मागवताना आपल्या समाजातील विषमतेवर आणि चढाओढ, स्वार्थ यांसारख्या मूलभूत स्वभाववैशिष्ट्यांवर लिहावे असे आम्ही सुचवले होते. तदनुषंगाने श्रीधर सुरोशे यांचे बर्ट्रांड रसेल यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ या ग्रंथाचे परीक्षण उल्लेखनीय वाटते. त्यांच्या परीक्षणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अनुक्रमे ग्रंथपरिचय आणि ग्रंथसमीक्षा असा असून यात बर्ट्रांड रसेलांनी आणि डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या …